न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- यूपीए सरकारच्या काळात चारशे रुपयांमध्ये मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मे २०२२ मध्ये एक रुपयांपेक्षा जास्त किमतीने महाग झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.
याच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा रविवारी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गॅस सिलेंडरला हार घालून श्रद्धांजली वाहिली.
या आंदोलनात अध्यक्षा सायली नढे, माजी नगरसेविका निर्मला कदम, नंदाताई तुळसे, निर्मला खैरे, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, छायाताई देसले, दिपाली भालेकर, सुप्रिया पोहरे, प्रियंका कदम, आशा भोसले, अनिता अधिकारी, वैशाली शिंदे, अनिता भिसे, भारतीताई घाग, राणी राठोड, रिटा फर्नांडिस, सीमा हलकट्टे, शिल्पा गायकवाड, सोनू दमवाणी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.