- संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास समाजवादीचा पाठिबा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रु.) :- उस्मानाबाद जिल्ह्यातील लाहोरा तालुक्यातील हराडी येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या, अल्पवयीन मुलीवर रक्षकच भक्षक बनुन कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला आहे.
बलात्कारी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरळी गावातील काही तरुणांनी हे प्रकरण उघडीस आणल्यानंतर संस्थाचालकांनी पोलिसात गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त होते. तरी त्यांनी असे न करता हे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न करीत त्या मुलांना धमकीवजा इशारा देण्यात आला. अत्याचारित मुलगी अनाथ असल्यामुळे तिच्यावर अनेक वर्ष सातत्याने आळीपाळीने संस्थेतील शिक्षक, शिपाई व इतरांकडून बलात्कार झाला आहे.
बलात्कार करणाऱ्या आरोपींचे वय २५ पासून पन्नासपर्यंत आहे. तर त्या पीडित मुलीचे वय अवघे पंधरा वर्ष आहे. म्हणजे पीडित मुलगी असल्याने संस्था चालकांनी हे प्रकरण माहिती असतानाही या प्रकरणाला वाचा न फोडता आरोपींना पाठीशी घालत जन्मासाठी प्रोत्साहित केले आहे. तरी या मागील षड्यंत्राची गंभीर स्वरूपाची दखल घेण्यात यावी, आरोपींना फाशीची सजा द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर संभाजी ब्रिगेड व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. त्यास शहर पिंपरी-चिंचवड समाजवादी पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे, असे रफिक कुरेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.











