- आ. जगताप यांचा रुग्णालयातून कार्यकर्त्यांना हात हालवत, हसतमुख प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना आजारपणामुळे काही काळ व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. सर्व हालचाल मंदावल्याने सर्वांच्या जीवाला घोर लागला होता.
दरम्यान त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून आज गुरुवारी (दि. १२) रोजी सकाळी जगताप यांनी थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून बंद काचेच्या खिड़कितून आपल्या चाहत्यांना हात केला.
आमदारांनी सर्वांना हात हालवत, हसतमुखाने प्रतिसाद दिल्याने भाजपासह सर्वांचा उत्साह दुणावला आहे. आमदार जगताप यांना लवकर बरे वाटू दे यासाठी अनेक कार्यकत्यांनी पुन्हा प्रार्थना सुरू केली आहे.
कदाचित आठवडाभरात त्यांना घरी सोडण्यात येईल, असे त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप म्हणाले.