- तिघांच्या विरोधात सांगवी पोलीसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- नवी सांगवीतील प्रगती ज्वेलर्समध्ये दोन महिला आणि एक पुरुष ग्राहक बनून आले. त्या तिघांनी सोने खरेदीच्या बहाण्याने कानातील झुमके पाहण्यासाठी मागितले. झुमके पाहत असताना हातचलाखी करून ४० हजारांचे ९.५०० ग्राम वजनाचे सोन्याचे झुमके चोरून नेले.
हा प्रकार गुरुवारी (दि. १२) रात्री साडेसात वाजता घडला. विजय मारुती देवकर (वय ३९, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आणि एक पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.