न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय दिले. हे खूप महत्त्वाचे आहे ही शिकवण जनमानसात रुजवण्याचे कार्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर केले. त्यांचा समाजसेवेचा वारसा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी पुढे नेत आहेत.
यंदाचे वर्ष महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पिंपरी चिंचवडमधील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. १४) वाकड पोलिस स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात बॅरिकेट्स पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलिस स्टेशन सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे १, वाकड पोलिस स्टेशन संतोष पाटील यांनी स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाकड सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे संतोष पाटील, पोलीस हवालदार दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले बॅरिकेट्स वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी बंदोबस्त, मोर्चे, आंदोलने, नाकाबंदी इत्यादी कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतील असे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.