न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- मोशीतील पुणे – नाशिक महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील प्रभाग क्र. ३, ५ आणि ७ बोराटेवस्ती ते बनकर वस्ती येथील ६१ मीटर रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकाम व पत्राशेडवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शनिवारी (दि. १४) कारवाई केली.
कारवाईमध्ये ३५ (अनाधिकृत पत्राशेड /वीट बांधकामे/ आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ एकूण ३०००० चौ. फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी बोराटे वस्तीलगतच्या बाधकामे पाडण्यास जेसीबीच्या साहाय्याने सुरुवात केली. यावेळी दक्षता म्हणून स्थानिक पोलिस, राज्य राखीव दल तसेच महापालिकेचे काही अधिकारी, अग्निशमन बंब, पोलिस व्हॅन आदी ताफा उपस्थित होता. येथील बाधित बांधकाम व पत्राशेड मालकांना अगोदरच ती काढून घेण्याविषयी नोटिसा मिळाल्या होत्या.
















