न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी हे त्यांच्या घराबाहेर दुचाकीवर बसलेले असताना आरोपी तेथे आले.
हा प्रकार चिंचवड येथे घडला. यासीन निसार खान (रा. श्रीराम कॉलनी, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लक्ष्मीकांत रामचंद्र चलवादी (वय १९, रा. साईनाथनगर, स्पाईन रोड, बिजलीनगर) याला पोलिसांनी अटक केली. तर विशाल खंडागळे, अथर्व ऊर्फ चण्या शिंदे, ओम गायथळे व दोन अल्पवयीन मुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
















