न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १०) :- अमित गोरखे युथ फाऊंडेशन, कलारंग कलासंस्था व प्राईड फिल्म टेलिव्हिजन इन्स्टियूट यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल येथील नॉव्हेल इन्स्टिटयूटमध्ये शनिवार (दि. ९) रोजी एक दिवसीय अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये अभिनय दिग्दर्शन, निवेदन, फिल्म मेकिंगल, स्किन प्रिटिंग, व्हॉईस ओव्हर, डबिंग याबाबतीत योग्य मार्गदर्शन कऱण्यात आले. कार्यशाळेत अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, लेखक प्रमोद जोशी, निवेदक भाऊसाहेब कोकाटे, दिग्दर्शक दिपक रेगे, प्रसिद्ध नाट्य आणि सिने दिग्दर्शक सुनील नाईक, प्राईड इन्स्टियूटचे रवी कोंढाळकर, अमित गोरखे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते. प्राईडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सिनेमा आणि मालिकांसाठी कसे ऑडिशन द्यावे, नाटक व अभिनय तंत्रातील फरक, कॅमेरासमोर काय करायला हवे आणि काय करायला नको, संवादफेक कशी असावी, आवाजाचा टोन कसा असावा, अभिनेता तसेच अभिनेत्रीने कोणती काळजी घ्यावी, भाव रसरुप कसे असावे, अभिनयात जीवंतपणा कसा आणावा आदी बाबींवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.











