न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- भोसरी येथील संजय हुंदाई शोरूमच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने १० लाख रुपये किमतीची एक कार कशाच्यातरी साहाय्याने चालू करून चोरून नेली.
ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी दहा ते शनिवारी (दि. १४) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली. प्रशांत पंडित सुतार (वय ४०, रा. दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.