- एकाला अटक दुसरा फरारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाने निगडीतील ओटास्कीम येथून चार किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
अर्जुन सखाराम खाडे (वय ५०, रा. गणेश हौसिंग सोसायटी, ओटास्कीम) असे अटक केलेल्याचे नाव असून सावळा शिवाजी खाडे (रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) हा फरारी आहे.
आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकला. त्यात चार किलो १३६ ग्राम गांजा व एक मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अर्जुन याने हा गांजा सावळा याच्याकडून आणला होता.