न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- चिंचवड वाल्हेकरवाडी येथील कारवाईत सोहेल इस्माईल शेख (वय २१, रा. विठाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.
तर, निगडीतील मिलिंदनगर येथील कारवाईत आकाश गौतम शिंदे (वय २४, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, दळवीनगर, निगडी) व शंकर ब्रम्हदेव शिंदे (वय २९, मिलिंदनगर, ओटास्कीम, निगड़ी) यांना शस्त्र विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.