- निगडीतील घटना; ट्रक चालक ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२२) :- रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली. तन्वी गव्हाणे (वय १५, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
तन्वी निगडीला मावशीकडे आली होती. तन्वीचे नाक टोचन्यासाठी रविवारी (दि. १५) सकाळी ती तिच्या मावशीसह सराफ दुकानात गेली होती. तेथून परतत असताना निगडी उड्डाणपुलाजवळील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यालगत थांबलेली तन्वी ट्रकच्या चाकाखाली सापडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.