न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२२) :- बांधकाम करीत असलेली रावेत येथील जागा वतनाची असल्याचा करारनाम्यात उल्लेख न करता दोघांनी ही बाब फिर्यादीपासून लपवून ठेवली. यामध्ये फिर्यादीचे अठरा लाखांचे नुकसान केले.
तसेच विकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा दहा कोटी ८५ लाख रुपयांची खंडणी नाही दिली, तर पोलिसात तक्रार करण्याची तसेच बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची धमकी दिली. हा प्रकार हिंजवडीतील फेज वन येथे घडला. सचिन किरणदास सोनिगरा (रा. चिंचवड स्टेशन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चंद्र लक्ष्मणदास रामनानी, किरण चंदू रामनानी (दोघेही रा. सुखवानी पॅराडाईजसमोर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.