न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभाला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात शुक्रवार, दि. २० मे रोजी, स. ११.०० वाजता हा समारंभ होणार आहे.
फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, पद्मश्री प्रतापराव पवार यांना मानद पदवी, डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट) तसेच मान्यवरांना मानद पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे, कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, सचिव मा.डॉ. सोमनाथ पाटील आदींच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.