न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड पोलिसांनी दोन वर्षासाठी आरोपीला शहरातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. सोमवारी (दि. १६) सकाळी साडे अकराच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे तलवार हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला कोयत्यासह ताब्यात घेतले. नीलेश सुनील पवार (वय २६ रा. फातिमानगर, आदर्शनगर, मोशी) असे आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत .
















