- शहरातील वीट बांधकाम, पत्राशेड उध्वस्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज मंगळवारी (दि. १७) रोजी मोठी कारवाई केली. ”ब, क, ड”, क्षेत्रीय कार्यालयांतगर्त अनधिकृत वीट बांधकाम, पत्राशेड आदींवर कारवाई केली. कारवाईत पालिकेचे अधिकारी, कमर्चारी, पोलिसांचे पथक सामील झाले होते.
या अंतर्गत ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाने पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड येथील अनधिकृत व्यावसायीक पत्राशेडवर कारवाई केली. कारवाईत ५३ पत्राशेड, अंदाजे ५०,००० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
“क” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पुणे नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य ते बोराटेवस्तीपर्यंत ६१ मी. रस्ता रूंदीतील अतिक्रमणे निष्कासीत केली. कारवाईमध्ये ४२ (पत्राशेड / बांधकामे), अनधिकृत पत्राशेड निष्कासीत केली. निष्कासीत केलेले पत्राशेडचे अंदाजे क्षेत्रफळ ३०२६६ चौ.फुट आहे. तसेच कारवाईत ४२ टप-यांचेही निष्कासन करण्यात आले.
ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत रावेत येथील जाधवघाट येथे २ आरसीसी बांधकाम व ३ वीट बांधकाम व ४१ पत्राशेड असे एकूण अंदाजे ४९२० चौ.मी. (५२,९५९ चौ.फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.












