- ४६ पैकी २२ प्रभागात एससी तर तीन प्रभागात एसटीची एक जागा राखीव..
- यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय होणार पालिका निवडणूक…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेनुसार ४६ प्रभागांपैकी २२ प्रभागात अनुसूचित जातीसाठी (एससी) एक जागा आणि तीन प्रभागात अनुसूचित जमातीसाठी (एसटी) एक जागा राखीव असणार आहे.
पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा प्रभागातील एक जागा, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक १० प्रभागात एक जागा एससीसाठी राखीव असेल. तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दोन प्रभागात एक जागा, तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात एक जागा एसटीसाठी राखीव असेल. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ६ (दिघी-बोपखेल) आणि प्रभाग क्रमांक ४४ (पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर, काशिदनगर) या दोन प्रभागात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे दोन्ही आरक्षण असतील. महापालिकेच्या नगरसेवकांची एकूण संख्या १३९ आहे. त्यामुळे एससीसाठी २२ आणि एसटीसाठी ३ असे एकूण २५ जागा सोडल्यास उर्वरित ११४ जागा ओपन म्हणजे सर्वसाधारण गटासाठी असतील.
दरम्यान ओबीसीसाठी आरक्षण निश्चित असायचे. पण राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पेरिकल डाटा गोळा न केल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण उडाले आहे. आता फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी निवडणुकीत आरक्षण असणार आहे.
अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के राजकीय आरक्षण आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांची एकूण संख्या १३९ आहे. १६ टक्केप्रमाणे १३९ पैकी २२ जागा अनुसूचित जातीसाठी आणि ३ टक्केप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव असतील. तसेच महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे आता सर्व इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
अनुसूचित जातीसाठी “हे” २२ प्रभाग असतील राखीव
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग
१) प्रभाग क्रमांक १७, वल्लभनगर, एच ए कॉलनी, संत तुकारामनगर (एससीची लोकसंख्या ६ हजार ३४२)
२) प्रभाग क्रमांक १८, मोरवाडी, मसुळकर कॉलनी, गांधीनगर (एससीची लोकसंख्या ७ हजार ९९९)
३) प्रभाग क्रमांक १९, चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर (एससीची लोकसंख्या ११ हजार ५७१)
४) प्रभाग क्रमांक २०, काळभोरनगर, रामनगर, विद्यानगर (एससीची लोकसंख्या ११ हजार ४८२)
५) प्रभाग क्रमांक २९, भाटनगर, मिलिंदनगर (एससीची लोकसंख्या १६ हजार ५०८)
६) प्रभाग क्रमांक ४३, दापोडी, गणेशनगर (एससीची लोकसंख्या ११ हजार १३४)
भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग
७) प्रभाग क्रमांक ३, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी (एससीची लोकसंख्या ५ हजार ७६३)
८) प्रभाग क्रमांक ६, दिघी-बोपखेल गावठाण (एससीची लोकसंख्या ६ हजार ८०)
९) प्रभाग क्रमांक ११, इंद्रायणीनगर, बालाजीनगर (एससीची लोकसंख्या ८ हजार ९५०)
१०) प्रभाग क्रमांक १४, यमुनानगर, कृष्णानगर, त्रिवेणीनगर (एससीची लोकसंख्या ५ हजार ८१३)
११) प्रभाग क्रमांक २२, निगडी ओटास्कीम, निगडी गावठाण (एससीची लोकसंख्या ११ हजार ४९५)
१२) प्रभाग क्रमांक १६, नेहरूनगगर, विठ्ठलनगर (एससीची लोकसंख्या ६ हजार ९५०)
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग
१३) प्रभाग क्रमांक २४, मामुर्डी, किवळे, रावेत (एससीची लोकसंख्या ८ हजार २३)
१४) प्रभाग क्रमांक २५ वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा (एससीची लोकसंख्या ६ हजार ३७५)
१५) प्रभाग क्रमांक ३२, तापकीरनगर, ज्योतिबानगर (एससीची लोकसंख्या ५ हजार ७०१)
१६) प्रभाग क्रमांक ३३, रहाटणी (एससीची लोकसंख्या ५ हजार ९०८)
१७) प्रभाग क्रमांक ३४, थेरगाव बापूजीबुवानगर, अशोका सोसायटी (एससीची लोकसंख्या ६ हजार ८७१)
१८) प्रभाग क्रमांक ३५ थेरगाव, बेलठीकानगर (एससीची लोकसंख्या ६ हजार ६६६)
१९) प्रभाग क्रमांक ३७, ताथवडे, पुनावळे, काळाखडक (एससीची लोकसंख्या ७ हजार २०९)
२०) प्रभाग क्रमांक ३९ पिंपळेनिलख, वेणूनगर, कावेरीनगर (एससीची लोकसंख्या ६ हजार ७४२)
२१) प्रभाग क्रमांक ४४, पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर (एससीची लोकसंख्या ७ हजार ११)
२२) प्रभाग क्रमांक ४६, जुनी सांगवी, ममतानगर (एससीची लोकसंख्या ७ हजार ९१९)
अनुसूचित जमातीसाठी “हे” ३ प्रभाग असतील राखीव
१)प्रभाग क्रमांक ६, दिघी, बोपखेल गावठाण (एसटीची लोकसंख्या २ हजार ५७३)
२) प्रभाग क्रमांक ४१, पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती (एसटीची लोकसंख्या २ हजार ३३३)
३) प्रभाग क्रमांक ४४, पिंपळेगुरव, राजीव गांधीनगर (एसटीची लोकसंख्या २ हजार १८)












