न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- ‘माझा वैद्यकीय शिक्षण कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. माझी डी. वाय. पाटील कॉलेजमधील मॅनेजमेंटमध्ये ओळख आहे’, फिर्यादी यांच्या मुलीस एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीकडून पाच लाख रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. तेव्हापासून आत्तापर्यंत मुलीला प्रवेश मिळवून न देता फसवणूक केली.
आरोपीमुळे फिर्यादी यांच्या मुलीचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने तिचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. तसेच फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २०१७, २०२२ या कालावधीमध्ये फिर्यादी यांच्या राहत्या घरी तसेच वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे घडली.
प्रताप लक्ष्मण वाघमारे (वय ६४, रा. कोंढवा, पुणे) यांनी मंगळवारी (दि. १७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन कुबेर शेळके (रा. महेशनगर, पिंपरी) मूळगाव हरळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.