न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२२) :- ताथवडे येथील वळूमाता केंद्र प्रक्षेत्र येथील लाकूड, रिकामे बारदान, लोखडी भंगार साहित्याची आरोपीने लिलाव पद्धतीने चार लाख ६४ हजार ३७३ रुपये इतक्या मालाची उचल केली. त्यापैकी त्याने एक लाख ६५ हजार रुपये रक्कम भरणा केला तसेच आरोपीच्या बँक खात्यावर योग्य रक्कम नाही हे त्याला माहिती असताना त्याने प्रक्षेत्र वळूमाता केंद्र ताथवडे यांच्या नावाने २ लाख ९९ हजार ३७३ रुपयांचा धनादेश दिला.
तो धनादेश वटला नाही. धनादेश परत आला असून त्याच्याकडून येणे रक्कम न भरता टाळाटाळ करून प्रक्षेत्र वळूमाता केंद्र ताथवडे यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १५ फेब्रुवारी २०१८ ते १७ मे २०२२ या दरम्यान घडला. वळूमाता केंद्र ताथवडेचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. हरिचंद्र जनार्दन अभ्यंकर (वय ५१, रा. पिंपळे निलख) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप भगवान अवघडे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















