न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ फेब्रु.) :- वंचित आघाडी करणारेच आपल्याला वंचित ठेवतील, कारण गेल्या ५० वर्षात आरक्षण मागताना दिड कोटीसाठी मागायचं आणि वाटून घेताना ’मात्र ’फक्त आपल ६५ लाख लोकातचं वाटायचं. यातचं थोरल्या भावाने आपल्याला वंचितचं ठेवलं आहे. ५८ बारक जातीची लोकसंख्या ६७ लाख असतानाही केवळ ६५ लाखातच वाटून घेण्याची जूनी सवयच आहे, अशा परिस्थितीत पुन्हा वंचितांचे नाव सांगून आपलं नुसकान करतील, त्यामुळे सामाजिक धोरण ठरविताना सवलतीचा एम. आय. एम. चा निट अभ्यास करून, राजकीय धोरण ठरवा, अशी रोखठोक भुमिका प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मांडली आहे
जो समाज शहाणा असतो. त्या समाजाचा नेता हा गंभीर नसला तरी चालतो, मात्र, जो समाज वंचित आहे. त्यांचा नेता हा गंभीर असावा लागतो. काहीजण वंचितांसाठी आघाडी काढून मोठे काम करणार, असा भास निर्माण करीत आहेत. त्यामुळे वंचितासाठी आघाडी काढणारे आता लवकरच वंचित होतील, अशा शब्दांत प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी वंचित आघाडीचे नेते खा. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच मातंग समाजाने दखलपात्र होण्यासाठी प्रत्न करावेत, असे आवाहन ढोबळे यांनी पुण्यात केले.
आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद प्रतिष्ठान पुणे आयोजित मातंग समाजाचा राज्यव्यापी मेळावा सोमवार (दि. ११) रोजी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या समारंभाचे प्रमुख वक्ते प्रा. ढोबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. अंबादास सगट, दादासाहेब सोनवणे, नगरसेविका स्वाती लोखंडे, लहुजी वस्ताद स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, शंकर तडाखे, अॅड. सोनावणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या महामेळाव्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करणत आले होते.
ढोबळे म्हणाले की, भीमा कोरेगावच्या संघर्षातून दलितांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्या आक्रमक भूमिकेमुळेच बौद्धांची सरकारला दखल घ्यावी लागली. त्या तुलनेत मातंग समाज आक्रमक होताना दिसत नाही. त्यामुळे समाजाची दखल घेतली जात नाही. आपला मुलगा किंवा मुलीने शिकून चांगले काम करावे, अशी धारणा आता समाजात निर्माण झाली पाहिजे. पाण्यालाही पेटविण्याची क्षमता आज समाजात असताना समाजाची दखल घेतली जात नाही, ही बाब खेदाची आहे. त्यासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्रित आरक्षणाचे जातीनिहाय पुनर्सर्व्हेक्षण करावे. मगच जातीची संख्या फुगवून सांगण्यारांचे पितळ उघडे पडेल. जातीचे सर्वेक्षण झाले, तर खरेच वंचितांना न्याय मिळेल. मगच लोकसंख्येनुसार अबकडप्रमाणे वर्गवारी करण्यात यावी, याकरीता या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद प्रतिष्ठानचे सुनिल खंडागळे, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे कष्ट घेतले. त्याचबरोबर प्रा. सगट, दादासाहेब सोनवणे, अशोक लोखंडे, शंकर तडाके, भाऊसाहेब सोनवणे या सर्वच मान्यवरांनी पालकमंत्री बापट साहेबांच्या उपस्थितीत आक्रमक भूमिका मांडली आणि विस्ताराने मांडणी केली व त्यासाठी कष्ट घेतले.











