न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रु.) :- अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत चिंचवड येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ किलो गांजा जप्त केला आहे. सव्वा तीन लाख रूपये किंमतीचा हा गांजा आहे.
प्रल्हाद सुनील माचरे (वय-२१, रा. गांधीनगर झोपडपट्टी, जळगाव), संतोष बन्सी गुमाने (वय-३८, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.











