न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- पिंपरीतील मोरवाडी येथे मंगळवारी (दि. ३१) रात्री साडेदहाच्या दरम्यान भीषण आग लागली. महापालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीत कंपनीतील प्लास्टिक कॅरेट, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य आणि कागदपत्रे जळाली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तीन कंपनीचे मिळून लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले आहे.