न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- पुणे शहरातून नऊ दुचाकी तसेच मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर शहरातून प्रत्येकी एक दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून विमाननगर भागात सापळा रचून अटक करण्यात आली.
चोरट्याकडून सहा लाख रुपयांच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. मोन्या उर्फ विनोद आनंद कांबळे (वय ३०, रा. हिराबाई झोपडपट्टी, लांडगे चाळ, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.