न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा शवागरासमोर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक धावती मोटार जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
गुरुवारी एक लाल रंगाची मोटार (क्र. एमएच ०४, जीजे ०३५३) लोणावळ्याच्या दिशेने येत असताना मोटारीने अचानक पेट घेतला. काही क्षणातच मोटार पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने आग लागल्याचे समजताच मोटारीत असलेले पाच जण बाहेर निघाल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती समजताच आयआरबी अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे शमविली. मात्र, तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.
















