न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२२) :- किवळे येथील डी मार्टमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या आरोपीने डी – मार्ट वेअर हाऊसमधील डिस्पॅच एरियातून तेलाचे एकूण ८३ डबे व किराणा माल भरलेले करेट्स असा ३ लाख १७ हजार रुपयांचा माल स्कॅन केला नाही.
या मालाची येथील स्टाफ तसेच ट्रान्सपोर्टच्या टेम्पो चालकाला माहिती न देता दोन आरोपीना तो माल विकला. स्टोअर मॅनेजर मयूर विश्वास (रा. वाकड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अक्षय राजेंद्र मोरे (रा. थॉमस कॉलनी, देहरोड) असे अटक केलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा माल खरेदी करणारे तेजस चंदनशिव (रा. किवत, ता. भोर) व किरण शंकर मोरे (रा. कर्नाविड ता. भोर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. देहरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


















