- चार किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईजवळ रस्त्याच्या कडेला एक महिला गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.
पोलिसांनी महिलेकडून एक लाख १४ हजार २५० रुपयांचे चार किलो ५७० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलीस नाईक संदीप पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेखा संतोष सुकळे (वय ३५, रा. कावेरीनगर भाजी मंडईजवळ, झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















