न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२२) :- पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील वाकडहुन देहूरोडच्या दिशेने जात असताना किवळे पुलावर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीवरील दाम्पत्य व त्यांची दोन्ही मुले खाली पडली.
गंभीर जखमी झाल्याने आई व मुलीचा मृत्यू झाला तर, वडील व मुलगा गंभीर जखमी झाले. जखमीना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरचालक घटनास्थळावरुन पळून गेला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















