- पालिकेकडून युद्धपातळीवर गोळाबेरीज करण्याचे काम सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत ओबीसी टक्केवारी किती? याची माहिती संकलनाचे काम बीएलओच्या माध्यमातून सुरू आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने याबाबत सूचना केल्या आहेत.
घरोघरी जाऊन माहिती संकलित होत आहे. बूथ विभागाचे प्रमुख यांच्याकडे हे काम सोपविले आहे. ही माहिती संकलित करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्र – दिवस काम करावे लागणार आहे. पाच दिवसांत माहिती संकलिक करताना अधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. दहा जूनपर्यंत माहिती संकलित करून अहवाल विभागीय आयुक्तांना द्यावा लागणार आहे.
आयोगाच्या कार्यकक्षेप्रमाणे उपलब्ध अभिलेख, अहवाल, इतर माहितीच्या आधारे ओबीसीबाबतीत आरक्षण ठरविण्यासाठी विविध सांख्यिकी माहिती आयोगाकडून गोळा केली जात आहे. ओबीसी प्रवर्गाची टक्केवारीची माहिती संकलित करून सांख्यिकी अहवाल पुणे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार माहिती संकलित करण्यासाठी मतदार यादी आणि भागनिहाय जबाबदारी निश्चित करून संकलनाचे काम सुरू आहे. त्यानंतर ही माहिती सरकारला पाठविण्यात येणार आहे.
– बाळासाहेब खांडेकर, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त…















