न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ अ ‘ व ‘ ब ‘ क्षेत्रिय कार्यालयाने मुंबई – बेंगलोर हायवे लगत अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर गुरुवारी (दि. ९) कारवाई केली.
यात १२ पत्राशेड, ८ विट बांधकाम व पत्रा असे एकुण २० बांधकामे अंदाजे ४१५९.०० चौ.मी. (४४६५८.०० चौ. फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ८ व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल ५४ कर्मचारी, ५ जेसीबी तसेच १४ मजुर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
















