- १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान; निवडणुक आयोगाची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जून २०२२) :- देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहे. २१ जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. कारण देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. १८ जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि १५ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे.
१५ जून अधिसूचना जारी होणार, २९ जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख, २ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार, १८ जुलै, मतदान होणार, २१ जुलै, निकाल लागणार, २४ जुलैपर्यंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ, मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांना पेन देणार, ५,४३२०० इतके यंदाच्या मतांचे मूल्य, ४८०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार, ७७६ खासदार, ४०३३ आमदार मतदान करणार, संसद आणि विधानसभांमध्ये पार पडणार मतदान प्रक्रिया, १० दिवस आधी सूचना केल्यावर हव्या त्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार. राजकीय पक्षांना मतदारांना व्हीप लागू करता येणार नाही.
राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या पाच नावे चर्तेत असल्याचीही माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व चारही महिला असल्याने पुढच्या राष्ट्रपती या महिला असण्याचीही दाट शक्यता आहे. यात चर्चेतली चार नवे तर सध्या विविध राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहेत. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन, झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांचा समावेश आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर त्यालाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही.