- दोघांना कोयत्याने मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- दुचाकीवरून फिर्यादी व त्याचा मित्र त्यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी हातात तलवार कोयते, दांडके भिरकावत आलेल्या टोळक्याने परिसरात व दुकानदारांमध्ये दहशत निर्माण केली.
फिर्यादी यांना अडवून आरोपीने ‘तू माझ्या एरियात का येतोस हा माझा एरिया आहे’, असे म्हणत फिर्यादीवर कोयत्याने वार केला. तसेच फिर्यादीच्या मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार रहाटणीत घडला.
सुमीत दयानंद सोमवंशी (रा. परमवीर कॉलनी, तापकीर मळा, काळेवाडी, मूळ लातूर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श, शशिकांत बनसोडे, सुनील गाडे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















