न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि. ११ जून रोजी संपन्न होणार होता.
हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.