न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२२) :- शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना लावल्या जाणा-या जाहिरात फलकांमुळे चौकांचे विद्रुपीकरण होते. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या आहेत.
अनधिकृत जाहिरातींबाबत काही तक्रार असल्यास ती क्षेञीय अधिकारी यांचेकडे नोंदवावी. जर क्षेञीय अधिकारी यांचेकडून त्यांचे तक्रारीची दखल घेण्यात न आल्यास त्यांनी याबाबत नोडल ऑफिसर तथा सहा आयुक्त (परवाना) यांचेकडे दाद मागावी. नागरिकांच्या तक्रारीसाठी दुरध्वनी क्रमांक 67333333 विस्तार 1122 व टोल फ्री क्रमांक 8888006666 असा आहे.