- अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२२) :- एचडीएफसी बँकेचे चिखली रोड येथे इंद्रायणी वजन काट्याजवळ एटीएम मशीन आहे. रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास चोरटे एटीएम सेंटरमध्ये घुसले.
सीसीटीव्ही कॅमे-यांना ब्लॅक स्प्रे मारला. चोरट्यांनी एटीएम मशीनचा उजव्या बाजुचा एटीएम वॉल्ट सेफ डोअर गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला असता मशीनने पेट घेतला.
त्यामुळे एटीएम मशीन, दोन ए सी युनिट, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, लॉबी लाईट सिलींग, साईड वॉल फर्निचर, एटीएम मशीनमधील ३ लाख ९८ हजार ७०० रुपये जळून खाक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.















