- कशी असेल वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२२) :- श्री क्षेत्र देहू पंतप्रधानांच्या हस्ते १४ जून रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकापर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा बदल १४ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत देहू रोड कमान (जुना मुंबई – हायवे) ते परंडवाल चौक, देहूगाव हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ता भक्ती – शक्ती चौक ते त्रिवेणीनगर तळवडे गावठाण कॅनबे चौक खंडेलवाल चौकमार्गे देहूगाव असा वापरावा. तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी तळवडे गावठाण चिखली ते डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसीकडे वळविली आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहू फाटा येथून देहूगावला जाणाऱ्या रस्त्यावरून अशी आहे.
पार्किंगची व्यवस्था तळेगाव इंदोरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी बायपास रस्त्यावर देहूगाव गायरान मैदानावर व ओम डेव्हलपर्स प्लॉटवर व्यवस्था करण्यात आली आहे. तळवडे कॅनबे चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी खंडेलवाल चौक रस्त्यावर दिगंबर कन्ट्रक्शन प्लॉट येथे पार्किंग राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. परंडवाल चौक ते देहू कमान चौक ते खंडेलवाल चौक हा रस्ता व्हीआयपी पासधारक सर्व प्रकारच्या वाहनांव्यतिरिक्त वाहनांसाठी बंद राहील. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.