न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड एसटी आगारातून अष्टविनायक दर्शन बससेवा शुक्रवार (दि. १७) पासून सुरू होत आहे. संकष्ट चतुर्थीनिमित्त या सेवेचा शुभारंभ होत आहे. कोरोनानंतर बंद असलेली एसटी सेवा पूर्ववत होत आहे.
यापूर्वीच्या सोयी सुविधा देण्यासह विविध मार्गांवरील सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक चतुर्थी दिवशी ‘ अष्टविनायक दर्शन ‘ बससेवा सुरू करण्यात येत आहे.
एसटीच्या ऑनलाईन नोंदणी आरक्षणासाठी पिंपरी चिंचवड आगार येथे बुकिंग चालू आहे. प्रवासात संस्थांच्या हॉलमध्ये सवलतीच्या दरात मुक्काम व भोजनाची सोय होईल. त्याचा व जेवणाचा खर्च प्रवासी भक्तांनी करावयाचा आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख स्वाती बांद्रे यांनी केले आहे.
असा असेल मार्ग…
अष्टविनायक यात्रा संकष्ट चतुर्थीच्या एक दिवस आधी सुरू होईल. तर संकष्ट चतुर्थी दिवशी सांगता होईल. एक दिवसीय ओझर येथे मुक्काम राहील. याचा मार्ग वल्लभनगर, शिवाजीनगर, स्वारगेट, मोरगाव, सिद्धटेक, थेऊर, रांजणगाव, ओझर लेण्याद्री, महड, पाली असा असेल.