न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- कामावर जाण्यासाठी फिर्यादी कंपनीच्या बसथांब्याकडे निघाले होते. यावेळी आरोपी तेथे आला. जुन्या वादावरून फिर्यादी यांच्या मान, हातावर कोयत्याने वार करून जीवे जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान भोसरीतील धावडे वस्ती येथे घडली.
फिर्यादी हे ज्ञानेश्वर रामचंद्र आडे (रा. धावडे वस्ती, भोसरी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मारुती श्रीपालवाड (रा. धावडे वस्ती, भोसरी, मुळ नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.