न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- घराच्या दरवाजाला कडी लावून शेजारच्या घरी गप्पा मारण्यासाठी महिला दुपारी एकच्या दरम्यान गेली होती. अर्धा तास गप्पा मारल्यावर महिला घरी आली.
परत आल्यानंतर घरातील लाकडी कपाटातील एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोने -चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. हा प्रकार संभाजीनगर येथे घडला. महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.