- पोलिसांनी आरोपींच्या बांधल्या मुसक्या; १७ दुचाकी जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- दुचाकीवरून तीन इसम चाकणमध्ये संशयीतरित्या चालले होते. पोलिसांना पाहताच ते पळू लागले. तेव्हा पोलीसांनी एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्यांना पकडले. सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी म्हाळुंगे, चाकणसह अनेक ठिकाणी वाहनचोरी केल्याचे सांगितले.
प्रज्वल प्रताप देशमुख (वय २० वर्षे), अक्षय लहानू जाधव, (वय २७ वर्षे), तुषार भारत फटांगरे (वय-२१, सर्व राहणार, संगमनेर, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आणखी एक अल्पवयीन गुन्हेगारही यात सहभागी आहे.
पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नाशिक आदी परिसरातून दुचाकी चोरून त्या संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे ओळखीच्या नागरिकांना विकल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. आरोपी संगमनेरहून दुचाकीवरून येऊन चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफाटा व नाशिक परिसरातील मोटारींची चोरी करून रातोरात परत जात होते. चोरलेल्या मोटारी विकताना कागदपत्र नंतर देतो असे ते सांगत होते. अशाप्रकारे विकलेल्या १७ मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.