न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील स्वरा प्रवीण जाधव ने ‘ स्केटिंग ‘ (९६ तास) या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची जागतिक ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
बेळगाव येथे पार पडलेल्या स्पर्धेत ७ वर्षापासून ३० वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. या रिकॉर्डसाठी ४९६ खेळाडुनी भाग घेतला होता. राजे शिवछत्रपती स्पोर्ट्स अॅकॅडमी, पुणे येथील स्केटिंगच्या विद्यार्थ्यांनी ९६ तास सलग स्केटिंग करून विश्वविक्रम केला. या अटीतटीच्या स्पर्धेत अवघ्या सात वर्षांच्या स्वराने चमकदार कामगिरी करीत संघाला यश मिळवून दिले.
या पूर्वीसुद्धा स्वरा जाधव हिने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत चॅम्पियनशिपचा किताब पटकावला आहे. स्विमिंग आणि लाठीकाठीचे देखील ती प्रशिक्षण घेत आहे. तिला क्रीड़ा प्रशिक्षक जगदाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच महिला प्रशिक्षक प्रीती चौगुले, सह प्रशिक्षक आर्यन महाजन, प्रशांत कोरे, अक्षय कपडेकर नमरा अत्तार, मोहित वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मोठे होऊन तीला भारतासाठी ऑलिम्पिक मेडल मिळवायचे आहे.
















