न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यानामध्ये तसेच पर्यटन स्थळी माहितीचे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. तसेच शहरात अनेक ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळे, थोर व्यक्तींचे पुतळे आहेत. अशा ठिकाणी नागरिक, विद्यार्थी येत असतात.
शहरातील नागरिक, पर्यटक, विद्यार्थ्यांना पशु, पक्षी, पर्यटन स्थळांची माहिती करण्याच्या दृष्टीने उद्यानांमध्ये वन्य पशु-पक्षांची माहितीचे फलक, महत्त्वाच्या वनस्पतींच्या माहितीचे फलक तसेच ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळांच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत, असे या पत्रात महापौर जाधव यांनी म्हटले आहे