- पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदार संघात आहेत इतके मतदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पर्यंतची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी आज गुरुवार, दिनांक २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.pcmcindia.gov.in) तसेच महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांसाठी पाहण्यास उपलब्ध केलेली आहे.
दिनांक ३१/०५/२०२२ अखेर पुरवणी मतदारासह मतदार संघनिहाय महानगरपालिकेतील मतदार संख्या…
मतदारसंघाचे नांव दिनांक ०१/०१/२०२२ अखेर मतदार दिनांक ३१/०५/२०२२ अखेर पुरवणी मतदार एकूण मतदार
२०५- चिंचवड ५,६६,५७७ २०,२७२ ५,८६,८४९
२०६ – पिंपरी ३,६९,८०२ ६,६६८ ३,७६,४७०
२०७ – भोसरी ५,००,५४७ २७,२५२ ५,२७,७९९
२०३-भोर (ताथवडेगाव) ९,२२३ ३५२ ९५७५
एकूण मतदार १४,४६,१४९ ५४,५४४ १५,००,६९३
वर नमूद केलेली मतदार संख्या विधानसभा मतदार संघातील भाग यादीप्रमाणे प्र. क्र. १ ते प्र.क्र. ४६ मध्ये विभागली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की, मतदारांनी त्यांचे नाव त्यांच्या प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करावी. केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखानिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही
प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करणेसाठी व सदर प्रारूप मतदारयादी शुद्ध स्वरुपात व त्रुटीविरहीत होण्याच्या दृष्टीने सदर प्रारुप मतदार यादीवर दिनांक २३ जून २०२२ ते १ जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळ संपेपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.
हरकत/सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक विभाग,तळ मजला,पिंपरी-१८ अथवा मनपाच्या संबंधित ८ क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल करता येतील. मतदारांकडून प्राप्त होणा-या हरकत सुचनांवर संबंधित प्रगणक / पर्यवेक्षक कर्मचा-यांकडून समक्ष स्थळ पहाणी करुन योग्य हरकत सुचनांवर त्वरीत कार्यवाही करणेत येईल. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत. दिनांक ३१ मे २०२२ रोजीच्या विधानसभा मतदारयादीमध्ये ज्यांची नावे आहेत अशा मतदारांनाच महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तरी पिंपरी चिंचवड परिसरातील मतदारांनी कृपया आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खातरजमा करावी.
प्रारुप मतदार यादी मतदार संख्या…
प्रभाग क्रं. पुरुष स्त्री इतर एकूण
1 19970 15044 15 35029
2 18221 14195 3 32419
3 25370 20834 2 46206
4 12438 10517 2 22957
5 19030 16670 5 35705
6 19126 16599 1 35726
7 13412 10681 0 24093
8 20164 16307 0 36471
9 19419 13802 3 33224
10 19350 15288 1 34639
11 12792 10577 0 23369
12 13969 10486 2 24457
13 20062 16055 2 36119
14 16294 13984 1 30279
15 15598 14053 0 29651
16 15185 13317 2 28504
17 12319 10702 0 23021
18 19883 17903 1 37787
19 16181 14298 0 30479
20 18339 14912 1 33252
21 18380 15899 2 34281
22 17159 15406 0 32565
23 16775 16004 1 32780
24 27342 24638 3 51983
25 15912 13524 5 29441
26 14529 12878 4 27411
27 17412 16164 1 33577
28 19130 17910 1 37041
29 19034 17307 2 36343
30 18522 17239 2 35763
31 14733 12686 1 27420
32 17057 14447 0 31504
33 12393 10754 0 23147
34 11555 9631 0 21186
35 13306 11086 2 24394
36 16905 14245 2 31152
37 11791 9311 0 21102
38 29037 23604 7 52648
39 16257 14488 5 30750
40 21967 18976 0 40943
41 20519 18731 2 39252
42 17175 15335 0 32510
43 20101 18603 5 38709
44 11289 10364 1 21654
45 14387 12921 1 27309
46 20605 19272 0 39877
एकूण 800394 687647 88 1488129


















