न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२२) :- महापालिका कार्यक्षेत्रात कोविड १९ आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल रुग्णालय, आकुर्डी या ठिकाणी कोविड १९ आजाराच्या रुग्णांवर उपचाराकामी १० खाटांचे अतिदक्षता विभाग व ४० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरु करणेत आलेला आहे.
कोविड बाधित रुग्णांना या रुग्णालयात दाखल होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांकडून संदर्भ चिठ्ठी घेणे आवश्यक असेल. तसेच गरजेनुसार खाटांची संख्या वाढविण्यात येईल.