न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसली. कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील महिला आणि लहान मुलाचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार मात्र बचावला.
दुर्घटनेत त्याचा पाय मोडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीचा क्रमांक MH 14 JZ 1984 असा आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत आणि जखमी हे मुळचे राजस्थानातील असल्याचे समजते.