न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२२) :- झोपलेल्या अवस्थेत अल्पवयीन तरुणीच्या अंथरुणात घुसून आरोपीने तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती केली. तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करीत तिच्यावर बलात्कार केला.
हा प्रकार २७ जून पहाटे अडीचच्या दरम्यान घडला. पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवराज मचकुरे (रा. मुचलम, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.