- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घातली उद्घाटनासाठी गळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- नेहरूनगर येथील प्रस्तावित न्यायालयाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. १५ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संबंधित उद्घाटनासाठी न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडे पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनने तारीख मागितली आहे.
जुन्नर येथे नवीन न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती अभय ओक तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. अहमदखान पठाण यांची पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे आणि कार्यकारिणीने नुकतीच भेट घेतली. तसेच, नेहरुनगर येथे प्रस्तावित असलेल्या न्यायालयाच्या कामकाजाची माहिती न्यायमूर्तीना दिली. नेहरूनगर येथील होत असलेल्या नवीन न्यायालयाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ते काम लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती या प्रसंगी न्यायमूर्तींना देण्यात आली. तसेच न्यायालयाच्या उद्घाटनासाठी ऑगस्टची तारीख मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान सप्टेंबरमध्ये उद्घाटनासाठी तारीख देता येईल, असे न्यायमूर्ती ओक यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आतिश लांडगे, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. दिनकर बारणे, सचिव अॅड. निखिल बोडके, सहसचिव अॅड. सुनील रानवडे आदी उपस्थित होते.














