न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २८) दिघी आणि चाकण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिघी पोलिस ठाण्यात माणिक पवार (२१, रा. वडमुखवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस ठाण्यात शुभम अरुण चांदणे (१९ आंबेठाण चौक, ता. खेड), शंकर विठ्ठल मुंगसे (५५, रा. रासे, ता. खेड) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी – चिंचवडचा पदभार स्वीकारल्यानंतर फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मध्यंतरी वाहतूक विभागामार्फत ३४६ बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम २७९ आणि २९० आणि केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.















