- दोघांचाही शपथविधी संपन्न; महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकार…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- शिवसेना नेते एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला.त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या शपथविधीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करू असे त्यांनी म्हटले होते. मात्र,भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. तसे ट्विटही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केले आहे. त्यानुसार फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावरून भाजपातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.














