न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२२) :- दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी सायकलस्वाराकडील मोबाईल हिसकावला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नीलेश देवानंद भालेराव (वय २०, रा. हरगुडे वस्ती, चिखली), प्रतीक अशोक वाघमारे (वय १९, रा. तुळजाईनगर, चिखली) अशी संशयित आरोपींची नवे आहेत.
याप्रकरणी जहागीर अब्बास पिंजारी (रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी सायकलवरून थरमॅक्स चौक ते खंडोबा चौक या रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी फिर्यादीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.














