न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२२) :- स्वारगेट बसस्थानक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यान पीएमपी बसने फिर्यादी प्रवास करीत होत्या. त्यावेळी सोन्याचा राणी हार, नेकलेस, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या त्यांच्या जवळ होत्या.
एकूण चार लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार निगडी येथे घडला. याप्रकरणी महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.














